Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : रामनवमीचा उत्साहाला गालबोट ; मंदिराच्या विहिरीचे छत कोसळले !
    क्राईम

    मोठी बातमी : रामनवमीचा उत्साहाला गालबोट ; मंदिराच्या विहिरीचे छत कोसळले !

    editor deskBy editor deskMarch 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    इंदूर : वृत्तसंस्था 

    रामनवमीच्या दिवशी इंदूरमधून मोठी दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. आज देशभर अनेक ठिकाणी राम नवमीचा उत्सव साजरा होत असतांना अनेक मंदिरामध्ये हजोरो भाविक एकाच वेळी दाखल झाल्याने इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एक विहीरी वरील छत कोसळून त्या विहिरीत अनेक लोक पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

    इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत केसळल्याने सुमारे 50 जण विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि १०८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नाहीत.

    ही घटना घडली त्यावेळी मंदिरात कन्याभोज सुरू होता. या आपघातात काही मुलीही पडल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेनंतरही पायरीच्या आजूबाजूची जमीन सातत्याने खचत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात ही घटना घडली. बाल्कनीत लोक बसले होते. यादरम्यान वरील जमीन बुडाली. रामनवमी असल्याने मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती. पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचाव कार्य तातडीने करण्यात येत आहे. रुग्णवाहिका आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.