Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कारमधील ‘जीपीएस’ फोडले पत्नीचे बिंग ; वाचून व्हाल थक्क !
    क्राईम

    कारमधील ‘जीपीएस’ फोडले पत्नीचे बिंग ; वाचून व्हाल थक्क !

    editor deskBy editor deskMarch 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    कर्नाटकच्या बंगळुरू शहरात  कारमधील ‘जीपीएस’ प्रणालीमुळे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध स्थानिक न्यायालयात धाव घेतली आणि कोर्टाच्या आदेशानुसार दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

    खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याचे २०१४ मध्ये लग्न झाले. दोघांना ६ वर्षांची मुलगीही आहे. तो रात्रपाळीत काम करायचा आणि कारमधील जीपीएसचा डेटा तपासेपर्यंत सर्व सुरळीत होते. ‘मी २०२० मध्ये कार खरेदी केली. त्यात स्मार्टफोनशी जोडलेली जीपीएस प्रणाली होती.घरात कुणालाही याबाबत सांगितले नव्हते. एके दिवशी रात्रपाळीसाठी कामावर असताना कोणीतरी घरून गाडी बाहेर नेल्याचे लक्षात आले. जीपीएस तपासल्यावर कार एका हॉटेलबाहेर थांबल्याचे दिसत होते. पहाटे ५ च्या सुमारास कार पुन्हा घरी होती. मी हॉटेलला भेट दिल्यावर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मतदार ओळखपत्र दाखवून एक रूम बुक केली होती, हे समजले,’ असे त्या व्यक्तीने सांगितले.

    जीपीएस डेटा दाखवून जाब विचारल्यावर दोघांनी गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याला दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी आयपीसीच्या ४२०, ४१७ अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर, पत्नीलाही नोटीस बजावण्यात आली आहे, ती सध्या राज्यातील दुर्गम जिल्ह्यात राहत आहे. दरम्यान, ही बातमी व्हायरल झाली असून, तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे याबाबत नेटकऱ्यांमध्ये रंजक चर्चा रंगली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.