Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीचे निधन झाल्यावर तिने केले दिराशी लग्न अन घडले असे काही !
    क्राईम

    पतीचे निधन झाल्यावर तिने केले दिराशी लग्न अन घडले असे काही !

    editor deskBy editor deskMarch 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    आयुष्यात कधी काय होईल हे सांगणं खूप अवघड आहे. अनेकवेळा आपण विचारही न केलेलं अचानकपणे घडून जातं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. महिलेची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चढ-उतारांनी भरलेल्या महिलेच्या जीवनात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपल्या दीराच्या प्रेमात पडली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

    न्यू हॅम्पशायरमधील रहिवासी असलेल्या कॅटलिन नॉर्टनने आरोन स्मिथशी लग्न केलं. दोघांनाही अंमली पदार्थांचे व्यसन होतं आणि त्यांच्या लग्नाला 4 वर्षे लोटली. त्यानंतर कॅटलिन रिहॅबमध्ये गेली आणि पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कॅटलिनने फोनवर अॅरॉनला सांगितले की तिला घटस्फोट घ्यायचा आहे. कॅटलिनने पुढील कारवाई करण्यापूर्वी, अॅरॉनने स्वतःचा जीव घेतला.

    जेव्हा तिला हे कळले तेव्हा ती अपराधी वाटत होतं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिचा दीर रॉरी तुरुंगात होता. कॅटलिनने डेली स्टारला सांगितले की, रॉरीला भावासोबतचे प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वेळी मी अजिबात आवडले नाही, परंतु तिच्या पतीच्या मृत्यूनंतर फोनवर त्याच्याशी बोलले. रॉरीचा आवाज कॅटलिनच्या नवऱ्यासारखाच होता, त्यामुळे तिला तो खूप विचित्र वाटला.

    हळूहळू भा आणि वहिनी यांच्यात प्रेम निर्माण झाले. दोन्ही भावांच्या वागण्यात बराच फरक होता, पण तो नेहमी कॅटलिनला तिच्या नवऱ्याची आठवण करून देत असे. या जोडप्याला आता 2 मुले आहेत. रॉरीला आधीच एक मुलगा होता आणि कॅटलिन आणि अॅरॉनलाही एक मुलगा होता, त्यामुळे दोघेही एकूण 4 मुलांच्या कुटुंबात आनंदी आहेत. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आलीये. दरम्यान, कधी कोणाला कोणत्या परिस्थितीत कोणावर प्रेम होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रेम सांगून होत नाही असं म्हटलं जातं. यापूर्वीही प्रेमाचे अनेक विचित्र किस्से समोर आले आहेत. आपण विचारही करु शकत नाही अशा घटना चर्चेत आल्यात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.