Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खोके घेतले असते तर गुडघे टेकले असते ; संजय राऊतांचा दावा !
    क्राईम

    खोके घेतले असते तर गुडघे टेकले असते ; संजय राऊतांचा दावा !

    editor deskBy editor deskMarch 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरु असतांना ठाकरे व शिंदे गटातील वाद देखील सुरु आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर आलेली, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

    पण आपण खोके घेतले नाहीत. निष्ठा सोडली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले, आम्हालाही सांगण्यात आल कशाला राहताय? काय राहिलंय? तुम्ही आमच्याकडे या. मी म्हटलं, मी थुकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. थुंकतोय तुमच्या ऑफरवर या भाषेत बोललो.
    आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही खोके घेतले असते आणि गुडघे टेकले असते तर आम्ही त्या पदावर राहिलो असतो. एखाद्या पदासाठी लाचारी पत्कारणारा संजय राऊत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत ना, ते निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत, असेही राऊत म्हणाले.

    पद आज आहे, आज गेली उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे, असं संजय राऊतांनी सांगितले आहे. माझ्या पक्षाने मला जे दिलंय ते भरपूर दिलेलं आहे, असेही ते म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. त्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावर गच्छंती करण्यात आली आहे.

    #cmshinde #sanjayraut.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    निवडणूक की हुकुमशाही? धंगेकरांचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.