Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलीच्या खोलीत दोन विवस्त्र लोकांना पाहून बापाने केले असे काही !
    क्राईम

    मुलीच्या खोलीत दोन विवस्त्र लोकांना पाहून बापाने केले असे काही !

    editor deskBy editor deskMarch 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहून एका पित्याला राग अनावर झाला. त्याने दोघांवर गोळीबार सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर खुनी हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडाचं आहे.

    ४४ वर्षीय आरोपीचं नाव डेने व्हिक्टर मिलर आहे. त्याने आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहिलं होतं. त्यात एक व्यक्ती विवस्त्र अवस्थेत होती. हे पाहून तो संतप्त झाला आणि त्याने दोघांवर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन केला आणि मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 8 मार्च रोजी ज्या दोन व्यक्तींवर गोळीबार करण्यात आला ते मिलरचे रूममेट होते आणि ते दारूच्या नशेत होते, असं सांगण्यात आलं.

    मिलरने आपल्या मुलीच्या खोलीत दोन व्यक्तींवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांना दिली. अतिप्रमाणात दारू पिऊन ते चुकून मुलीच्या बेडरूममध्ये घुसले होते. मिलरच्या मुलीने स्वतः तिच्या वडिलांना सावध केलं की कोणीतरी तिच्या खोलीत प्रवेश केला आहे. मात्र कोणाला काही समजण्यापूर्वीच मिलरने गोळीबार केला. गोळ्या झाडलेल्या दोघांपैकी एक म्हणाला- ‘मिलर ओरडत होता की मी तुला मारीन.’ त्याने अगदी जवळून तीन-चार राउंड फायर केले. सध्या, मिलर ली काउंटी शेरीफ कार्यालयाच्या ताब्यात आहे. त्याला 10 एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मिलरवर प्राणघातक हल्ला, प्राणघातक शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.