Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव हादरलं : अनोळखी महिलेचे आढळून आले हाडे !
    क्राईम

    चाळीसगाव हादरलं : अनोळखी महिलेचे आढळून आले हाडे !

    editor deskBy editor deskMarch 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    येथून जवळ असलेल्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या एका ठिकाणी एका अनोळखी महिलेचे हाडे मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चाळीसगाव व ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव जवळील कन्नड घाटाच्या पायथ्याशी अंदाजे २०० मिटर अंतरावर बोढरे शिवारात झाडाझुडपात एका अनोळखी महिलेचे फक्त हाडे आढळून आल्याने चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वनपाल दीपक किसन जाधव यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि १२ मार्च २०२३ रोजीपासून दोन ते तीन महिन्यापूर्वी अनोळखी आरोपीने काही तरी अनोळखी कारणाने महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत गोणपाटमध्ये टाकून चाळीसगाव कन्नड महामार्ग क्र.२११ वरील घाटाच्या पायथ्याजवळ बोढरे शिवारात घाणेरीच्या झुडपात टाकून दिल्याचे आढळून आले असल्याने या विरोधात दीपक जाधव यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोनि.जाधव हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.