Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग !
    क्राईम

    एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMarch 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    सिडकोत एकतर्फी प्रेमातून घरात घुसून कुटूंबियांना जातीवाचक शिवीगाळ करीत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली.

    या प्रकरणी पोलिसांनी संशयितास गजाआड केले आहे. विशाल सुभाष शेलार (२८ रा. एकता चौक,राणेनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम (अ‍ॅट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी असून शेलार गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. एकतर्फी प्रेमातून त्याने गुरूवारी (दि.९) दुपारच्या सुमारास मुलीचे घर गाठून तिच्याकडे प्रेमाची मागणी केली होती. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे संतप्त युवकाने दुस-या दिवशीही तिचे घर गाठत कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करीत मुलीचा विनयभंग केला. यावेळी त्याने माझ्याशी संबध ठेवले नाही तर तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक आयुक्त सोहेल शेख करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026

    जळगावात खान्देश महोत्सव २०२६ – स्थानिक महिला व उद्योजकांचा रंगीबेरंगी उत्सव!

    February 20, 2026

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.