Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री प्रेयसीच्या घरी जाणे प्रियकराला पडले महागात !
    क्राईम

    मध्यरात्री प्रेयसीच्या घरी जाणे प्रियकराला पडले महागात !

    editor deskBy editor deskMarch 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    अनेक प्रियकर आपल्या प्रेयसीच्या घरी कुणी नसल्यावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरी जात असता पण एका प्रियकराला हे घरी जाणे खूप महागात पडले आहे. त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला आणि त्याला ‘मोरल पोलीसिंग’च्या नावाखाली एका गटाने बेदम मारहाण केल्याने तो जखमी होऊन त्याचा रूग्णालयात मृत्यू झाल्याचा प्रकार केरळच्या त्रिशूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात पोलीसांनी आठ जणांविराेधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत.

    केरळच्या त्रिशूरमध्ये एका आठ तरूणांच्या गटाने एका अविवाहीत तरूणाला तो त्याच्या विवाहित मैत्रिणीला मध्यरात्री भेटायला गेला असता बेदम चोप दिल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका मंदिराजवळ लागलेल्या कॅमेऱ्यात हा सर्व घटनाक्रम चित्रीत झाला. 18 फेब्रुवारीला ही धक्कादायक घटना घडली असून या जखमी बस चालकाचा त्रिशूरच्या एका रूग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला आहे.

    मोरल पोलिसिंगचा धक्कादायक प्रकार केरळच्या त्रिशूरमध्ये घटला आहे. सहर हा पेशाने बस ड्रायव्हर असलेला अविवाहित तरूण त्याच्या विवाहित मैत्रिणीला मध्यरात्री भेटायला गेला होता. तेव्हा आठ जणांच्या एका ग्रुपने त्याला जाब विचारत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, विशेष म्हणजे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा घटनाक्रम चित्रीत झाला आहे.

    पोलिसांनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या माहितीनूसार चेरपू येथील या तरूणाला त्याच्या मैत्रिणीचा मध्यरात्री फोन आला म्हणून तो तिला भेटायला गेला. या तरूणाला त्या विवाहित महिलेच्या घराजवळ दबा धरून बसलेलया एका गटाने आधी जाब विचारला आणि नंतर लाथाबुक्क्यांनी बेदम चोपले. या जखमी तरूणावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात राहूल, बिजिथ, विष्णु, बीनू, अरुण, अभिलाष या तरूणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळावरील मंदिरात तरूणाला झालेल्या बेदम मारहाणीचा घटनाक्रम चित्रीत झाला आहे. आरोपी तरूण घटनेनंतर फरार झाले आहेत. पोलीस या तरूणांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तरूणाच्या किडन्या आणि बरगड्यांना जबर मार लागण्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.