Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू !
    क्राईम

    धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskMarch 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शिरसोलीदरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने वरखेडी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इजास रसूल काकर (वय २७, रा. वरखेडी ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. इजास रसूल काकर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. भांडे विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी सुरत जाण्यासाठी इजास हा पाचोरा येथून जळगावला येण्यासाठी मेमू ट्रेनने बसला होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोली ते जळगाव रेल्वे रूळ दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जळगाव रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्याच्याजवळील मोबाईलच्या आधारे ओळख पटली.

    त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. रविवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई जुबेदाबी, पत्नी रिजवानाबी, ८ महिन्यांची मुलगी उमेन व भाऊ अरबाज असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास रेल्वे पोलिस कर्मचारी सचिन भावसार करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.