Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आदिवासी बांधवांच्या होळीला जल्लोषात सुरुवात !
    राज्य

    आदिवासी बांधवांच्या होळीला जल्लोषात सुरुवात !

    editor deskBy editor deskMarch 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुरबार : वृत्तसंस्था 

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. धुळ्यात शिरपूर तालुक्यात भोंगऱ्या बाजाराला सुरुवात झाली आहे. सध्या या उत्सवामुळे शहरात मोठं उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लोकगीत, गायन, बासरी वादन आणि ढोलाच्या तालावर आदिवासी बांधव पारंपारिक कलाविष्कार सादर करत असून या बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल होतेय.

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोडीद पनाखेड आणि दहिवद यांसह विविध भागांत होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजाराला उत्सवाला सुरुवात झाली असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन या उत्सवातून होत असते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून विविध गावातील आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत आहेत. कोरोनाच्या तब्बल दोन ते अडीच वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी प्रथमच कोणत्याही निर्बंधांशिवाय हा उत्सव पार पडत असून यामुळे मोठं उत्साहाचं वातावरण सध्या आदिवासीबहुल भागात पाहायला मिळत आहे.

    नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळीला सुरुवात झाली आहे. आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात होलिका मातेला नवस करत असतात. या दरम्यान आदिवासी बांधव नवस करत असताना आपल्या अंगावप पारंपरिक साज परिधान करतात. यामध्ये मोरपिसापासून तयार होणाऱ्या टोपाला अधिक महत्व आहे. मोरपिसाच्या टोपाला अधिक मागणी असल्याने ग्रामीण भागातील कारागिरांच्या हाताला अधिकच वेग आला असून मोठ्या प्रमाणात मोरपिसापासून टोप तयार करण्यात येत आहेत. मोरपिसापासून तयार केलेला हा टोप अधिक आकर्षक असल्याने त्याला बाजारात मागणी देखील जास्त होत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.