Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हृदयद्रावक : मुलाने दुपारी पेपर दिल्यानंतर बापाला दिला मुखाग्नी !
    क्राईम

    हृदयद्रावक : मुलाने दुपारी पेपर दिल्यानंतर बापाला दिला मुखाग्नी !

    editor deskBy editor deskMarch 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : वृत्तसंस्था 

    राज्यात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचा सामना करत परिक्षेला सामोरे जावे लागत असते. दरम्यान परिक्षा काळात घरातील कोणी व्यक्ती अचानक दगावल्यानंतर जे दु:ख येते त्याला सामोरे जात परिक्षा देणे खूप कठीण वेळ असते. परंतु सोलापूर जिल्ह्यात अशी एक घटना समोर आली आहे. अल्पशा आजाराने वडिलांचे सकाळी 8 वाजता निधन झालेले असताना मुलाने आपले दुःख बाजूला सारून आधी पेपर दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती येते घडली. वडिलांच्या निधनाचे दु:ख सहन करत बारावीचा पेपर दिल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास वडिलांच्या चितेला त्या मुलाने भडाग्नी दिला. एकीकडे आयुष्याचा पाया घडवणारी परिक्षा तर दुसरीकडे दु:ख अशी वेळ मुलासह कुटुंबीयांवर आल्याचे ग्रामस्थही हळहळले आहेत.

    हुलजंती येथील कल्लाप्पा आवा रूपटक्के (60) यांचे अल्पशा आजाराने काल (दि.03) सकाळी 8 वाजता निधन झाले. रुपटक्के यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून मुलगा तुकाराम हा एम.पी मानसिंगका विद्यालय सोडडी येथे बारावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचा शुक्रवारी गणिताचा पेपर होता. मात्र, वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलाला पेपर देता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी निर्णय घेऊन मुलाने आधी पेपर द्यावा विनंती केली.

    मुलाने जड अंतः कराने वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन घर सोडून परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिला. १०:३० ते २:१५ या वेळेत पेपर देऊन आल्यानंतर दुपारी ३:३० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत बोलताना त्याच्या महाविद्यालयाचे प्राचार्य बसवराज कोरे म्हणाले, आमच्या प्रशालेतील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील तुकाराम या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले.

    आज बारावी गणिताचा पेपर असून वडिलांचा मृतदेह घरामध्ये ठेवून तो पेपरला हजर झाला. हालाखीच्या परिस्थितीमध्ये दुःखावर मात करून परिस्थितीशी कसा संघर्ष करावा या विद्यार्थ्याच्या धाडसी वृत्तीची कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुकारामच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून आई मूकबधिर आहे. जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. मी पोलिस अधिकारी व्हावे असे वडिलांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांनी मला पेपर देण्यास सांगितले. आता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कणार असल्याचे तुकाराम म्हणाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.