Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पती पत्नीच्या वादामुळे परिवारातील सात जणाचे गेले प्राण !
    क्राईम

    पती पत्नीच्या वादामुळे परिवारातील सात जणाचे गेले प्राण !

    editor deskBy editor deskMarch 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून कुठल्याही प्रकारे हि गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेतच नाही. नर्मदेच्या कालव्याच्या नजीक घडली आहे. एकाच कुटुंबातील 7 जणांनी कालव्यात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. ही घटना राजस्थान येखील असून इथल्या एका कुटुंबियांतील पती पत्नीच्या वादामुळे घरातील सगळ्यांचेच प्राण गेले आहेत. एका कॉल रेकॉर्डनं हा घात केला असल्याचे समोर आले आहे. परंतु नक्की असं काय झालं ज्यामुळे ही घटना घडली?
    समोर आलेल्या माहितीनुसार, या केसमध्ये पत्नीचे घरापाशीच राहणाऱ्या दुसऱ्या एका इसमाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आपल्या पत्नीचे दुसऱ्याच पुरूषाशी प्रेमसंबंध असल्याचे कळताच पतीनं याबद्दल पत्नीला अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यासंदर्भात ग्रामपंचायतीतही या पतीनं आपल्या कुटुंबातील या समस्येची व्यथा मांडली होती परंतु त्यातून फार काही पदरी पडले नव्हते त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद सुरू होते. या दोन पती-पत्नींना 5 मुलंही होती.

    आपल्या परिवारासोबत मोकळा वेळ घालवावा या अर्थानं ते दोघंही आपल्या 5 चंही अपत्यासंह फिरायला गेले होते. परंतु त्या प्रवासात असे अचानक काय घडले काय त्या दोघांनी आपल्या पाचही मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी मारत जीव दिला आहे. त्या सर्वाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे त्यातून मृत पतीच्या भावानं पत्नीच्या प्रियकराविरूद्ध पोलिसात तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. त्यातून या प्रकरणाचा सखोल तपासही पोलिस घेत आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, एकाच चितेवर सात जणांना मुखाग्नी दिला आहे.
    या प्रकरणाची सुरूवात पत्नीचे असलेले विवाहबाह्य संबंध हे होते. एकदा पत्नीचे फोनवरचे बोलणे त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं ऐकले आणि त्यामुळे एकेदिवशी तिचा मोबाईल चोरून तिच्या फोनमधील रेकॉर्डींग ऑन केले आणि पुढच्या वेळी तिचे कॉल्स रेकॉर्ड (Call Recording) झाले त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. पतीनं तिला बजावलेही की त्याच्याशी परत बोलायचे नाही परंतु पत्नीनं ते काही ऐकले नाही त्यांचे संबंध सुरूच राहिले आणि मग त्यावरून पती-पत्नीमध्ये भांडणं सुूरू झाली. त्या दिवशीही तेच झाले असावे. परंतु परिवारानं एकत्र जीव का दिला याचा तपास अजून लागला नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात शांतता समितीची बैठक; सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा

    August 2, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.