Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील ‘त्या’ अपघातातील दुसरा तरूण ठार !
    क्राईम

    जळगावातील ‘त्या’ अपघातातील दुसरा तरूण ठार !

    editor deskBy editor deskMarch 2, 2023Updated:March 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्कजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुसर्‍या तरूणाही बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश विसपुते (30, रा.कांचन नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, अपघातातील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

    मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील के.सी.पार्कजवळ मंगळवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) याचा जागीच मृत्यू झाला होता. यातील समाधान बाविस्कर (रा.आमोदा खुर्द) जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपुते (रा.कांचन नगर, जळगाव) असे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील अमोल प्रकाश विसपुते याचा उपचारादरम्यान बुधवारी दुपारी 2.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कांचन नगरातील मित्र परिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली. मयत अमोल हा रेमंड कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामाला होता. गेल्या पाच दिवसांपासून रेमंड कंपनी बंद असल्याने अमोल घरीच असल्याने मित्रासोबत बाहेर गेला होता. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि विवाहित बहिण असा परीवार आहे. या घटनेबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार रवींद्र सोनार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.