Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात नकली नोटा बनविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
    क्राईम

    जळगावात नकली नोटा बनविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    editor deskBy editor deskMarch 2, 2023Updated:March 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातून जवळ असलेल्या एका गावातील ३० वर्षीय तरुणाने युट्यूब वरून पाहून घरात भारतीय चलनाच्या नकली नोटा छापणाऱ्या संशयताला पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून बुधवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छापा टाकून अटक केली आहे. कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव (वय-३०) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी की, कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव हा भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाल्यानंतर यांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे पोना.महेश महाले, रविद्र मोतीराया, निलेश पाटील, सुहास पाटील, राहुल भैसाने  रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, सचिन साळुंखे यांनी कारवाई केली.

    एमआयडीसीच्या व्ही सेक्टरमध्ये सापळा रचून नकली नोटा वापरात बाजारात देत असल्याची खात्रीलायक सूचना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी देविदास पुंडलिक आढाव (वय-३०, रा. कुसुंबा ता. जि. जळगाव) याला रंगेहात पकडून अटक केली. त्याच्याजवळ असलेल्या कापडी पिशवी जवळपास ४६ हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या. त्याची चौकशी केली असता युट्युबवर नोटा छापण्याचे पाहून या नकली नोटा छापल्या आहे, असे त्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार १ मार्च रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देविदास पुंडलिक आढाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.