Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात दुचाकीची अपघात एक तरूण ठार !
    क्राईम

    जळगावात दुचाकीची अपघात एक तरूण ठार !

    editor deskBy editor deskMarch 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजता भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात आमोद्यातील दुचाकीस्वार ठार झाला तर तिघे जखमी झाले. अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) मृत तरूणाचे नाव आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द गावातील डंपर चालक असलेला गणेश सपकाळे हा आसोदा येथील मालकाकडे मंगळवारी कामाला गेल्यानंतर रात्री गावातील मित्र समाधान प्रल्हाद बाविस्कर (आमोदा खूर्द) याच्यासोबत दुचाकीने आमोदा खुर्द गावाकडे येत असताना कानळदा रोडवरील केसी पार्क येथे रात्री 11.30 वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाला तर समाधान बाविस्कर आणि समोरील दुचाकीवरील जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपूते (कांचन नगर, जळगाव) हे तिघे जण गंभीर जखमी झाले.

    या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसानही झाले. बुधवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत तरुणाच्या पश्चात आई उषा, वडील सोमा गोविंदा सपकाळे, लहान भाऊ गोपाल, पत्नी छाया, मुलगा जयेश आणि मुलगी असा परीवार आहे. या घटनेबाबत जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.