Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी
    क्राईम

    एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी

    editor deskBy editor deskMarch 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    एका तरुणासाठी दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळच्या वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट बनल्यांचं चित्र सध्या दिसत आहे. शिवाजी पार्कात का बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिनेमामध्ये दाखवतात, त्याप्रमाणे ‘एक फुल, दो माली’ अशा ही घटना आहे.

    यवतमाळच्या वणीमध्ये नगरपालिकेच्या शिवाजी पार्कमध्ये एका तरुणासाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. दोन तरुणींसोबत एका तरुणाचं लपूनछपून रिलेशनशिप सुरु होतं. मात्र काल (27 फेब्रुवारी)अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

    व्हायरल व्हिडीओमधील तरुणी कॉलेजमधील असल्याचं दिसून येत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस उपटून आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली आहे. तरुणींनी एकमेकींना शिवीगाळ केली आहे. सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींमधील राडा पाहायला मिळत आहे. या चारही कॉलेजमधील असल्याचं पाहायला मिळत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस ओढून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका तरुणामुळे या तरुणींमध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलं जात आहे. ही हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दीही जमली असून उपस्थितांनी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

    एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये राडा…
    व्हिडीओ व्हायरल, यवतमाळमधील घटना…#Viral #Girlfight #Trending pic.twitter.com/DaMTO4InFq

    — Viral Fever (@Viral_Kida) February 28, 2023

    सोशल मीडियावर सध्या हाणामारीचे व्हिडीओ जास्त व्हायरल होतात. अलिकडेच काही महिन्यांपूर्वी लोक डब्यातील महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या लोकलमधील महिलांनी एकमेकींना केस ओढून मारहाण केली होती. आता या तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी फ्री-स्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.