Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वधूची हळदीच्या दिवशी निघाली माहेरातून अंत्ययात्रा !
    क्राईम

    वधूची हळदीच्या दिवशी निघाली माहेरातून अंत्ययात्रा !

    editor deskBy editor deskFebruary 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय मुलीचा सोमवारी नियोजित हळदीचा कार्यक्रम होता यासाठी वर पक्षातील काही नातेवाईक मुलीला घेण्यासाठी वधूच्या घरी आले असता. हळद लागण्याच्या वेळी हळद लागणार होती. मात्र सायंकाळी हळद लावण्याच्या वेळेसच तिची आई-वडिलांच्या घरूनच अंत्ययात्रा निघण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. तिच्या हातावरील मेहेंदी विवाहापूर्वीच क्रूर काळाने पुसून टाकली.

    एरंडोल तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय युवतीचा विवाह मंगळवारी होणार होता. त्यामुळे घरामध्ये लगीनघाई व आनंदाचे वातावरण होते. सोमवारी तिला वरपक्षाकडील पाहुणे घेण्याकरिता सोमवारी सायंकाळी तिला हळद लागणार होती. त्याआधीच सकाळी ११ वाजेच्या सुमारास या नियोजित वधूने शेतातील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकारामुळे तिच्या आईवडिलांसह लग्नानिमित्त आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी एकच हंबरडा फोडला. लग्नाच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडल्यामुळे एकच शोककळा पसरली. विवाह समारंभासाठी सजलेल्या मंडपात दुःखदायी वातावरण निर्माण झाले. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.