Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन मित्राचे होते एकाच मुलीवर प्रेम : एकाने केले असे काही !
    क्राईम

    दोन मित्राचे होते एकाच मुलीवर प्रेम : एकाने केले असे काही !

    editor deskBy editor deskFebruary 27, 2023Updated:February 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हैदराबाद : वृत्तसंस्था 

    येथील एका २२ वर्षीय युवकाने आपल्या मित्राची गळा दाबून हत्या केली. हा मित्र युवकाच्या प्रेयसीला सातत्याने मेसेज व काॅल करत होता. युवकाने मित्राचे शिर धडावेगळे केले, तसेच हृदय व गुप्तांग, बोटे कापून काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर तो पोलिस ठाण्यामध्ये स्वत:हून हजर झाला व मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

    पोलिसांनी सांगितले की, आरोपी युवकाचे नाव हरिहर कृष्णा असून त्याने आपला मित्र नवीन दिलसुखची हत्या केली. हे दोघे जण व हरिहरची प्रेयसी एकाच महाविद्यालयात शिकत होते. हरिहर, नवीन एकाच मुलीवर प्रेम करत होते. मात्र, नवीनने आपल्या मनातील भावना सर्वप्रथम त्या मुलीकडे व्यक्त केल्या. त्याचे व मुलीचे प्रेमसंबंध जुळले व मात्र त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर ही मुलगी व हरिहर यांच्यात प्रेम फुलले. मात्र, यामुळे हरिहर अस्वस्थ झाला होता. १७ फेब्रुवारी रोजी नवीन व हरिहर यांनी मद्यप्राशन केले होते. त्यावेळी त्यांची मुलीच्या मुद्द्यावरून बाचाबाची झाली. त्यावेळी संतापाच्या भरात हरिहरने आपल्या मित्राची हत्या केली.

    हत्या केल्यानंतर हरिहरने नवीनच्या मृतदेहाची छायाचित्रे काढली व ती व्हॉट्सॲपवर आपल्या प्रेयसीला पाठविली होती. आता याप्रकरणी पोलिस हरिहरच्या प्रेयसीचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. निक्की यादव, श्रद्धा वालकर यांच्या अतिशय निर्घृण हत्यांनी देश हादरला असतानाच आता हरिहरने मित्राच्या केलेल्या हत्येचे प्रकरण उजेडात आले. नवीनच्या मृतदेहाची हरिहरने ज्या क्रूर पद्धतीने विटंबना केली तो सारा प्रकार अंगावर सरसरून काटा आणणारा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.