Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दुचाकी चोरटा अटकेत !
    अमळनेर

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दुचाकी चोरटा अटकेत !

    editor deskBy editor deskFebruary 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील बसस्थानक परीसरातून अट्टल दुचाकी चोरट्याच्या गुरूवारी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने चोपडा आणि अमळनेर तालुक्यात दुचाकी चोरींची कबुली देत तीन दुचाकी काढून दिल्या आहेत. अधिक कारवाईसाठी संशयीताला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. राजेश श्रीराम बारेला (22, मोहन पडवा, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    अमळनेर शहरातून एक आणि चोपडा शहरातून दोन अश्या तीन दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हा चोपडा शहरातील बसस्थानकात आल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, दीपक शिंदे, प्रमोद ठाकूर यांनी गुरूवारी दुपारी दोन वाजता सापळा रचून संशयित आरोपी राजेश श्रीराम बारेला याला चोरीच्या दुचाकीसह अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोपडा शहरातून दोन आणि अमळनेर शहरातून एक अश्या तीन दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026

    उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

    April 17, 2026

    एकरुखी शिवारात विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या शार्ट सर्कीटमुळे पिकांचे मोठे नुकसान !

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.