Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकतर्फी प्रेमातून तरुणाने केले असे काही !
    क्राईम

    एकतर्फी प्रेमातून तरुणाने केले असे काही !

    editor deskBy editor deskFebruary 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील दहीवद गावातील १९ वर्षीय तरुणीचा एका तरुणाने गेल्या सहा महिन्यापासून एकतर्फी प्रेमातून पाठलाग केला. मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यासोबत लग्न कर असेच सांगून तिला धमकी दिली मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपी तरुणाने तरुणीचे लग्नदेखील मोडले. या प्रकरणी तरुणाविरोधात यावल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील दहीवद गावातील १९ वर्षीय तरुणीने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच संशयित हेमंत विजय पाटील हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करीत होता. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर म्हणत लग्नासाठी गळही घातला. तरुणीने या प्रेमसंबंधाला नकार दिला असता या तरूणाने तिला एकतर्फी प्रेमातून मी तुला जिवंत सोडणार नाही व तुझे लग्न होवू देणार नाही, अशी धमकी दिली. तरुणीचा विवाह निश्चित झाल्यानंतर नियोजीत वराशी हेमंत पाटील याने मोबाईलवर संपर्क साधून खोटे बोलून या तरुणीचे लग्न मोडले. या प्रकरणी शुक्रवारी या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत विजय पाटील विरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे, राजेंद्र पवार, अनिल साळुंके करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.