Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहिणीचे बदनामी करत असल्याने भावाने केला तरुणाचा खून !
    क्राईम

    बहिणीचे बदनामी करत असल्याने भावाने केला तरुणाचा खून !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे : वृत्तसंस्था 

    बहिणीची बदनामी केल्याच्या रागातून धुळ्यात भावाने एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल तरुणाचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु केला. सखोल तापासानंतर 12 तासात या हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. सतिश मिस्त्री असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सतिशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. चेतन गुजराती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
    सतिश हा चेतनच्या बहिणीबद्दल उलट सुलट बोलून तिची बदनामी करत असे. याच रागातून चेतनने अल्पवयीन आरोपीच्या मदतीने सतिशची हत्या केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोहाडी पोलिसांच्या मदतीने अवघ्या 12 तासात मारेकऱ्याचा छडा लावला. या प्रकरणी चेतन गुजरातीसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली.

    मोहाडी परिसरातील सतिश मिस्त्री या तरुणाची मुंडके छाटून काल निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अवधान शिवारात शिर नसलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात खुनाचा उलगडा लावला असून, आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
    तरुणीच्या मागे लग्नाचा तगादा लावणाऱ्या एका तरुणाची मुलीच्या भावाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटी परिसरात घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयितास ताब्यात घेतले आहे. विकास रमेश नलावडे असे हत्या करण्यात आलेल्या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. एका तरुणीवर विकास याचे प्रेम होते. त्याला संबंधित तरुणीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे विकासने सतत तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. ही बाब मुलीच्या भावाला समजल्याने त्याने विकासचा काटा काढला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.