Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नी शेतात असताना पतीने घरात संपविले जीवन !
    क्राईम

    पत्नी शेतात असताना पतीने घरात संपविले जीवन !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल शहरातील धक्कादायक घटना

    यावल ता प्रतिनिधी

    यावल शहरातील एका ३५ वर्षीय तरूणाने त्याची मुलं बाहेर खेळत असतांना राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी शिवाजी शामराव गाढे (वय-३५) हे पत्नी व मुलांसह या वास्तव्याला होता. पत्नी शेतात कामाला गेलेली होती. मंगळवारी २१ फेब्रुवारी रेाजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजी गाढे हा तरूण घरीच होता. त्याची दोन लहान मुले घराबाहे खेळत असतांना राहत्या घरात जावून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. शिवाजी गाढे याने साधारण दिड वर्षांपुर्वी देखील विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वेळीच उपचार घेतल्याने बचावला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.

    यावेळी तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी मयत घोषीत केले.याबाबत मयताचा भाऊ अशोक शामराव गाढे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.