Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेने पतीची हत्याकरीत रात्रभर झोपली मृतदेहाजवळ !
    क्राईम

    महिलेने पतीची हत्याकरीत रात्रभर झोपली मृतदेहाजवळ !

    editor deskBy editor deskFebruary 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    पतीने अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या केल्याच्या अनेक घटना रोजच समोर येत असता. पण झांसीमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने पतीची हत्या केली आणि रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत झोपली.सकाळी जेव्हा हे लोकांना समजलं तर सगळेच हैराण झाले. महिलेने सांगितलं की, पतीला आपल्याच मुलीवर रेप करायचा होता. विरोध केल्यावर त्याने मारहाण केली. यादरम्यान बचाव करण्यासाठी तिने त्याच्यावर हल्ला केला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

    मउराणीपूर गावातील ही घटना आहे. इथे राहणारा मनोहर मजुरी करून कुटुंबाचं पोलन-पोषण करत होता. त्याच्या पत्नीने सांगितलं की, त्याला दारूचं व्यसन होतं. नशेत तो नेहमीच तिला आणि मुलांना मारहाण करत होता. ज्यामुळे सगळेच वैतागले होते. महिलेचा आरोप आहे की, गेल्या रात्री पती दारू पिऊन घरी आला होता आणि शिव्या देऊ लागला होता. इतकंच नाही तर तो मुलीचे कपडेही फाडू लागला होता. विरोध केला तर त्याने मुलीवर आणि माझ्यावर काठीने हल्ला केला. बचाव करत तिने काठी हिसकावूण घेतली आणि त्याच्यावर हल्ला केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर महिला त्याच्यासोबत रात्रभर झोपून होती.

    सकाळी याची माहिती मृतकाच्या आईला आणि परिसरातील लोकांना झाली. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. मृत व्यक्तीच्या महिलेने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या मुलाची हत्या सून आणि नातीने केली. त्या आधारावर पोलिसांनी आई व मुलीला अटक केली. आरोपी महिलेने सांगितलं की, ‘मी माझ्या पतीला मारलं. तो दारूसाठी पैसे मागत होता. दिले नाही तर मारहाण करत होता आणि म्हणत होता की, मी मुलीवर रेप करेन. गेल्या रात्री त्याने तसा प्रयत्नही केला. त्यासाठी मी बचाव केला ज्यात त्याचा मृत्यू झाला’.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.