Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सावत्र बापाने मुलीसोबत असे केले कृत्य !
    क्राईम

    सावत्र बापाने मुलीसोबत असे केले कृत्य !

    editor deskBy editor deskFebruary 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेलमध्ये बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

    हि घटना पनवेलमधील विचुंबे भागामध्ये घडली आहे. यामध्ये एका सावत्र बापाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकत असून काही महिन्यांपूर्वी या पीडित मुलीवर तिच्या सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. मागच्या आठवड्यात या पीडित मुलीला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला आईने रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर खांदेश्वर पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. यानंतर पीडित मुलीने आपल्यावर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.