Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नाला येण ठरलं शेवटच : अपघातात विवाहिता ठार !
    क्राईम

    लग्नाला येण ठरलं शेवटच : अपघातात विवाहिता ठार !

    editor deskBy editor deskFebruary 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगावात आतेभावाच्‍या लग्‍नानिमित्‍ताने धरणगावातून येत असलेल्‍या विवाहितेचा पाळधीजवळ महामार्गावर झालेल्‍या अपघातात मृत्‍यू झाला. कविता प्रशांत चौधरी असे विवाहितेचा नाव आहे. तर दुचाकीस्वार विलास देवीदास चौधरी हे गंभीर जखमी आहेत.

    धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात राहतात. आत्याच्या मुलाचे लग्‍न असल्‍याने हळदीसाठी त्‍या सोमवारी शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांच्‍यासोबत दुचाकीवरुन येत होत्‍या. परंतु, पाळधीच्या पुढे आल्‍यावर मागून भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.

    डंपरने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता हे रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.