Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फेसबुकवर महिलेला मैत्र पडली महागात ; अशी झाली लुट !
    क्राईम

    फेसबुकवर महिलेला मैत्र पडली महागात ; अशी झाली लुट !

    editor deskBy editor deskFebruary 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    आपण नेहमीच सोशल मिडीयावर अनेक मित्र मैत्रीण बनवीत असतो पण यात किती खरे किती खोटे हे आपल्याला काहीच माहित नसते. अशाच एका ५२ वर्षीय महिलेला फेसबुकची मैत्री महागात पडली आहे.

    मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे फेसबुकवरील मित्राला सांगणे अलका पाटील (५२) या महिलेस ‘महाग’ पडले. मदतीच्या बहाण्याने त्या कथित मित्राने अलका यांना आठ लाखांना गंडा घातला. शुक्रवारी नवघर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्टमध्ये राहणाऱ्या अलका या गृहिणीचे पती चंद्रकांत हे गेल्यावर्षी अभिनय विद्या मंदिरमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. पतीच्या निवृत्तिवेतनावर घर चालत असल्याने मुलांच्या शिक्षणाकरिता जास्त पैसे खर्च होत असल्याने आर्थिक अडचण अलका यांनी त्यांचे फेसबुकवरील अनोळखी मित्र डॉ. रायन रोलांड नावाच्या व्यक्तीस सांगितली.
    त्या अनोळखी मित्राने आर्थिक मदतीकरिता अलका यांच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली. त्याने बँक ऑफ लंडनमधून अलका यांच्या खात्यात ८० हजार पौंड ट्रान्सफर झाल्याचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला. मात्र, नंतर अलका यांना फोन करून परदेशातून पैसे पाठवले असल्याने प्रोसेसिंग शुल्क म्हणून पैसे भरावे लागतील असे सांगून अलका यांच्याकडून ऑनलाइन तब्बल आठ लाख नऊ हजार रुपये उकळले.

    ८० हजार पौंडाचा मोह
     ८० हजार पौंड मिळणार म्हणून अलका यांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम, तसेच त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्या अनोळखी व्यक्तीच्या विविध खात्यात पैसे भरले.
     नंतर तुम्ही परदेशातून बेकायदा पैसे ट्रान्सफर करत असल्याने पोलिसांना माहिती देऊ अन्यथा साडेसहा लाख रुपये द्या, असे अलका यांना धमकावण्यात आले.
     आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर शुक्रवारी अलका यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी डॉ. रायनसह मिसेस निर्मला श्रीवास्तव व आणखी दोघा मोबाइल क्रमांकधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी समाज माध्यमांवर आपली माहिती देऊ नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘लाडकी बहीण’ योजनेत 71 लाख अपात्र; 21,300 कोटींचा लाभ वादात

    April 2, 2026

    भरधाव ट्रकने पिकअप उडवली, 8 महिला कामगार जागीच ठार

    April 2, 2026

    राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीत गूढ; सुनेत्रा पवारच्या पत्रात केवळ दोन पदांची माहिती

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.