Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पोलिसांचा दणका !
    क्राईम

    जळगावात अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पोलिसांचा दणका !

    editor deskBy editor deskFebruary 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील निर्भया पथकाने आज एका परिसरात गस्तीवर असतांना अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पकडून समज देत सोडले आहे, या घटनेची चर्चे जळगावात दिवसभर रंगली होती.

    शहरातील काही महाविद्यालय आवारात टवाळखोरांकडून उच्छाद मांडला जातो. तसेच महाविद्यालयात येणाऱ्या तरुणींची त्यांच्याकडून छेडछाडीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे शहरात निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक आज सकाळी गस्तीवर असतांना त्यांनी शहरातील जी.एस.ग्राऊडच्या समोरील ‘लव्ह’गल्लीत जात असताच या ठिकाणी अनेक तरूण तरुणी अश्लील चाळे करीत असतांना दिसून आले. यावेळी लागलीच निर्भया पथकातील महिला पोलिसांनी यातील काही मुलीना थांबविले, या मुलीना थांबवून पोलिसांनाच धक्का बसला. अवघ्या ७ वी व ८ वी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुली प्रियकरासोबत याठिकाणी चाळे करीत असतांना सापडल्याने सदर ठिकाणाहून तरुणांनी पळ काढला पण अल्पवयीन मुली पकडल्या गेल्या, त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता, त्यांनी महिला पोलिसांना बनवाबनवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यातील एका मुलीने उत्तरे दिले कि, माझा भाऊ आला होता. काही वेळाने महिला पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पालकांना फोन केला असता, ते पालक म्हणाले कि, मुलीला भाऊच नाही. पोलीस अजून बुचकळ्यात पडले. त्यानंतर त्या मुलाला फोन करून घटनास्थळी बोलविले असता, मग सर्व काही सत्य बाहेर आले. अवघ्या ७ वी ते ९ वीच्या अल्पवयीन मुलीना निर्भया पथकातील महिला कर्मचारीनी समज देत सोडून दिले.

    शहरातील विविध भागात तरुण-तरुणीचे घोळके तासनतास बसून त्याठिकाणी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असतो. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे निर्भया पथक प्रत्येक शाळा, महाविद्यालय, मेहरूण तलाव परिसर, कोल्हे हिल्स परिसर भागात नेहमी गस्त घालीत असून याठिकाणी होत असलेले प्रकार बंद करण्यास “लेडी सिंघम’चा पुढाकार आहे तर त्यांचा वचक हि सध्या बसू लागला आहे. आज झालेल्या कारवाईत निर्भया पथकात पो.कॉ. रंजना संजय बत्तीस, ममता तडवी, उज्ज्वला पाटोळे, राजश्री पवार, कविता गवई यांचा सहभाग होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.