Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात थंडीसह पावसाची दाट शक्यता !
    राष्ट्रीय

    राज्यात थंडीसह पावसाची दाट शक्यता !

    editor deskBy editor deskFebruary 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल असल्याने काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी पाऊस आणि धुक्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. आज २ फेब्रुवारी राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

    आजपासून पुढचे दोन दिवस राज्यात थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील काही भागात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे.

    राज्यामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून दुपारच्या वेळी उन्हाचा तडाका जाणवत आहे. राज्यात रत्नागिरीमध्ये उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे. दरम्यान, तमिळनाडूतील दक्षिण भागासह केरळमधील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तामिळनाडूतील समुद्रकिनारी भागामध्ये आज हवामानाची परिस्थिती बिघडू शकते. या ठिकाणी अनेक भागात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    खर्गे आणि सपकाळ यांना फडणवीसांचा बिनडोक टोला !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.