Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षक निघाला भक्षक : ७ मुलीना दाखविले ते व्हिडीओ !
    क्राईम

    शिक्षक निघाला भक्षक : ७ मुलीना दाखविले ते व्हिडीओ !

    editor deskBy editor deskJanuary 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृतसंस्था

    राज्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यातून शिक्षकी पेशाला काळिमा फासला गेला आहे. एका शिक्षकाने तब्बल ७ मुलीना अश्लील व्हिडिओ दाखवून गैरकृत्य केल्याची धक्कादायक बाब कोल्हापुरात उघडकीस आली आहे. यावरून पीडित शाळकरी मुलींच्या तक्रारीवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राधानगरी पोलीसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या असून अधिकचा तपास सुरू केला आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याची बाब उघडकीस आल्याने कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही कोल्हापूरमधील पालकांकडून केली जात आहे. . व्ही. पी. बांगडी असं नराधम शिक्षकांचे नाव आहे. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी संस्थेने तात्काळ शिक्षकांची बदलीही साताऱ्यात करून टाकली होती. मात्र, पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलीसांनी दखल घेऊन कारवाई सुरू केली आहे. सात मुलींना नको तिथे स्पर्श करून नराधम शिक्षकाने विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलींच्या पालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात केली होती, त्यावरून राधानगरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    संशयित आरोपी व्ही. पी. बांगडी या शिक्षकाला राधानगरी पोलीसांनी अटकही केली असून अधिकचा तपास केला आहे. याशिवाय आणखी मुलींवर अत्याचार केले आहे का? याबाबतचा तपासही सुरू करण्यात आला आहे. व्ही. पी. बांगडी हा शिक्षक नववी आणि दहावीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता, त्यानंतर त्यांना नको तिथं स्पर्श करून विनयभंग करत होता, मुलींनी ही बाब पालकांना सांगितल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शिक्षक गुरु असतात, त्याच गुरुने असं गैरकृत्य केल्यानं शालेय वर्तुळात संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. तब्बल दोन वर्षाहून अधिक काळापासून व्ही. पी. बांगडी हा शिक्षक शाळकरी मुलींवर अत्याचार करत होता. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यालंकार शेळेवाडी शाळेत ही संतापजनक घटना घडली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.