Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणाचे पोलीस होण्याचे स्वप्न ठरले शेवटचे ; भरधाव वाहनाने उडवले !
    क्राईम

    तरुणाचे पोलीस होण्याचे स्वप्न ठरले शेवटचे ; भरधाव वाहनाने उडवले !

    editor deskBy editor deskJanuary 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील अनेक तरुण पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नेहमीप्रमाणे सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या या तरुणासाठी सकाळ मात्र काळ बनून आली. रस्त्यावरून धावत असताना वाहनाच्या धडकेत कजगावच्या रोहित मराठे या तरुणाचा मृत्यू झाला.

    भडगाव तालुक्यातील कजगाव येथील १८ वर्षीय तरूण रोहित अशोक मराठे हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जात असताना चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रोहितच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत अपघाताला कारणीभूत असलेले वाहन घेऊन चालक फरार झाला.

    यावेळी मित्र वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन यांच्‍यासह दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील मदतीला धावले. उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन लावून उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची वार्ता कजगावात समजतात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेला रोहीत मराठे यांच्या मागे वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

    रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याला पोलिस विभागाचे आकर्षण होते. त्यासाठी तो मित्रांसोबत सकाळी मॉर्निंग वॉक करणे, सायंकाळी भरतीसाठी सराव करीत होता. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नित्याने व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या रोहितची सकाळ जणू काळ ठरली. ही घटना संपूर्ण गावातील नागरिक व रोहीतच्या मित्रांना धक्का देणारी आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.