Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रियकरासोबत मुलीला पाहिले या स्थितीत ; बापाने उचलले मोठे पाऊल !
    क्राईम

    प्रियकरासोबत मुलीला पाहिले या स्थितीत ; बापाने उचलले मोठे पाऊल !

    editor deskBy editor deskJanuary 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    उत्तर प्रदेशातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकरासोबत आपल्या मुलीला आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांनी रागाच्या भरात मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे, यानंतर आरोपीने स्वत: पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली, या प्रकरणाचा उलघडा पोलीस तपासात झाला आहे. ऑनर किलिंगची ही घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरची आहे. मुलीच्या ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. इंटर विद्यार्थिनीची हत्या अन्य कोणी नसून तिच्या वडिलांनी प्रेम प्रकरणातून केली. मुलीचे गावातीलच मुलासोबत प्रेम होते, वडिलांनी मुलीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर मुलीच्या हत्येचा कट रचला. घरात नेऊन मुलीला मारहाण केली. यानंतर मृतदेह बांधून तिची सायकल, शाळेची दप्तर आणि कपडे घेऊन तलावात फेकून दिले.

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 24 जानेवारी रोजी तलावात मुलीचा मृतदेह आढळून आला असून, तिच्या वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. 24 जानेवारी रोजी सिधौलीतील दिउरिया भागात असलेल्या तलावात इंटर विद्यार्थ्याचा मृतदेह कापडात बांधलेला आढळून आला होता. तिची सायकल, स्कूल बॅग आणि कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बारकाईने तपास करत आरोपी वडील सुखलाल याला अटक केली. सुखलालने पोलिसांसमोर या हत्येचा खुलासा केला आहे. या विद्यार्थिनीचे गावातील अवनीश या मुलावर प्रेम होते. आपली मुलगी आक्षेपार्ह अवस्थेत पाहून त्याने मुलीला घरी नेऊन समजावून सांगितले, मात्र तीने ऐकले नाही.यानंतर तिच्या हत्येचा कट रचला. हत्येनंतर तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून तिची सायकल बॅग व कपडे घेऊन गावातील तलावात फेकून देण्यात आले, आणि पोलिसांना त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून शाळेत प्रार्थनापत्र देण्यात आले. या खुनाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी सुकलाल याला अटक करून कारागृहात रवानगी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.