Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आईला ठार करीत बघत होता पोलिसांची वाट ; कारण वाचून व्हाल थक्क !
    क्राईम

    आईला ठार करीत बघत होता पोलिसांची वाट ; कारण वाचून व्हाल थक्क !

    editor deskBy editor deskJanuary 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेली असतांना एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मध्य प्रदेशात उघडकीला आलेले असून तिकमगड जिल्ह्यात अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाने आई आपल्याला जीव लावत नाही या भावनेतून आईवर गोळीबार करत तिचा जीव घेतलेला आहे. आई सतत ओरडायची आणि आपल्याला मारहाण करायची त्यामुळे आपण वैतागून गेलेलो होतो असे देखील त्याने म्हटले आणि वडिलांची बंदूक घेऊन आईवर गोळीबार केला त्यात आईचा मृत्यू झाला.

    तिकमगड येथील भरत नगर परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून सपना रजक असे मयत महिलेचे नाव आहे . आंघोळ केल्यानंतर आई बाहेर आली त्यावेळी आरोपी मुलगा हा समोरच उभा होता आणि त्याने आईवर गोळी चालवली. गोळी घालण्यापूर्वी त्याचे आईसोबत भांडण झालेले होते त्यामुळे तो बाथरूमच्या बाहेरच बंदूक घेऊन उभा होता आणि आई दिसताच त्याने गोळीबार केला. गोळीबारात आई मृत्युमुखी पडल्यावर तो घाबरून गेला मात्र त्याने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांची वाट पाहत घराबाहेर खुर्ची टाकून बसलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले असून प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.