Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात व्यापाऱ्याचे ८ लाख घेवून चोरटे फरार
    क्राईम

    जळगावात व्यापाऱ्याचे ८ लाख घेवून चोरटे फरार

    editor deskBy editor deskJanuary 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दुकानातील दिवसभर झालेले पैसे घेऊन घराकडे निघालेल्या ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी) या ड्रायफ्रुट व्यापाऱ्याची आठ लाख रूपये असलेली बॅग दबा धरून बसलेल्या तिघ चोरटयांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या पांडे चौक परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ घडली्. रात्री घटनास्थळी पोलिसांनी येवून पाहणी केली. त्यानंतर चोरटयांच्या शोधार्थ पथक रवाना झाले होते.

    शहरातील सिंधी कॉलनी येथील ईश्वर मेघाणी हे ड्रायपूटचे व्यापारी आहे. यांचे दानाबाजार येथे दुकान आहे. बँकेत भरणा करण्यासाठी सोमवारी त्यांनी आठ लाख रूपयांची रक्कम बॅगेत ठेवले होती. पण, बँकेत भरणा न करता आल्यामुळे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते पैशांची बॅग घेवून घराकडे दुचाकीने निघाले होते. राधाकृष्ण मंगल कार्यालायाजवळील गणेश कॉलनीकडे वळण घेत असताना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या तिघे चोरटयानी मेघाणी यांच्या दुचाकीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवर असलेल्या दुस-या चोरटयासोबत पोबारा केला.

    घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत यांच्यासह जिल्हापेठ, एमआयडीसी आणि एलसीबीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. मेघाणी यांनी घडलेली घटनेची संपूर्ण हकीकत पोलिसांसमोर कथन केकी. त्यानुसार पोलिसांनी चोरटयांचा शोध घेतला जात होता. यासोबत चोरटे कोणत्या दिशेने आले व गेले याचा सुध्दा तपास पोलिस घेत होते. तर सीसीटीव्ही सुध्दा त्यांनी तपासले. बॅग घेऊन चोरटे दोन दुचाकीवर पसार झाले. दरम्यान मेघांनी यांच्या मागून घराकडे जात असलेले अमर कारडा यांनी चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. बॅगेत मेघाणी यांचा मोबाईल व लॅपटॉप होते. चोरटे खेडी गावापर्यंत गेल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद करून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.