Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : ठाकरे गट करणार आज मोठी घोषणा !
    राजकारण

    मोठी बातमी : ठाकरे गट करणार आज मोठी घोषणा !

    editor deskBy editor deskJanuary 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    शिंदे गट नव्याने स्थापन झाल्यानंतर स्व.बाळासाहेब ठाकरे यांची आज पहिली जयंती आहे तर नियमित शिंदे व ठाकरे गटातील वाद मोठ्या प्रमाणावर बाहेर येत असतांना आज ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी मोठी घोषणा होणार असल्याची त्यांनी आज माहिती दिली आहे.

    “वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद आहे. नायगाव येथील आंबेडकर भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी क्रांतिकारक घोषणा होणार आहेत. युती संदर्भात मोठी घोषणा होणार आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू एकत्र येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सभा होईल तिथे उद्धव ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करतील.” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

    शिवशक्ती-भिमशक्ती ही विचारांची युती आहे. या शक्तीसमोर कोणतीही महाशक्ती टिकाव धरु शकणार नाही. ह्या दोन शक्ती एकत्र याव्या हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, असे देखील संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती वर संजय राऊत म्हणाले, “जिथे-जिथे मराठी माणूस पोहचला तेथे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली नसती. शिवसेना हे चार अक्षर नसते तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरुणांची जी गरम रक्तांची पिढी दिसते ती कधीच दिसली नसती. “कितीही राजकारण झालं तरी बाळासाहेब हृदयावर अजरामर आहेत. शिवसेनेत कोणतेही गट नाहीत हे भाजपचे राजकारण आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत ही बेईमानी आहे,” अशी टीका देखील संजय राऊत यांनी भाजपवर केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.