Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकीच्या धडकेत बैलगाडी स्वार ठार‎ !
    क्राईम

    चारचाकीच्या धडकेत बैलगाडी स्वार ठार‎ !

    editor deskBy editor deskJanuary 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर‎ वडगाव गावाजवळ बैलगाडीला‎ भरधाव आलेल्या चारचाकीने‎ धडक दिल्याने बैलगाडी स्वार ठार‎ झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी‎ साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.‎ प्रवीण काशीनाथ पाटील (वय ४०)‎ असे मृताचे शेतकऱ्याचे नाव आहे.‎

    शेतकरी प्रवीण पाटील हे‎ शुक्रवारी सकाळी साडेनऊ‎ वाजेच्या सुमारास‎ बऱ्हाणपूर-अंकलेश्वर‎ महामार्गावरून बैलगाडीने शेतात‎ जात हाेतेे. रावेरकडून भरधाव वेगाने‎ येणाऱ्या एमपी ०४ सीपी ६३८० या‎ क्रमांकाच्या ह्युंदाईची एक्सेंट‎ कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या कारने‎ बैल गाडीला मागून जोरदार धडक‎ दिली.

    त्यामुळे शेतकरी प्रवीण‎ पाटील हे बैलगाडीतून फेकले जावून‎ रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास‎ जबर मार लागून ते जागीच ठार‎ झाले. तसेच बैलगाडी कारच्या‎ धडकेने दामू पाटील यांच्या शेतात‎ फेकली गेल्याने एका बैलाचे शिंग‎ देखील तुटले आहे. ही कार मध्य‎ प्रदेशातील असून रुग्णास घेऊन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जळगावला जात होती. अपघात‎ प्रकरणी वडगाव येथील पोलिस‎ पाटील संजय वाघोदे यांनी निंभोरा‎ पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती‎ दिली.

    घटनास्थळी निंभोरा पोलिस‎ ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक‎ गणेश धुमाळ यांनी भेट दिली. त्यांनी‎ घटना स्थळाचा पंचनामा करून‎ मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात‎ शवविच्छेदनासाठी पाठवला.‎ निंभोरा पोलिस ठाण्यात वडगाव‎ येथील मृत पाटील यांचे नातेवाईक‎ धनराज पाटील यांनी फिर्याद‎ दिल्यानुसार कार चालकाविरोधात‎ गुन्हा दाखल झाला असून तपास‎ पाेलिस उपनिरीक्षक काशीनाथ‎ कोळंबे करत आहेत.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.