जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात अमृत २.० अंतर्गत मल्लनिस्सारण टप्पा दोनचा विकास आराखडा करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे मजीप्र व महापालिकेकडून अमृत २.० च्या करारनामा व विकास आराखडा तयार करण्याचे कामाला सुरवात लवकरच सुरू होणार आहे.
जळगाव शहरात अमृत योजने अंतर्गत मल्लनिस्सारण योजनेचे काम पाच झोन मध्ये दोन टप्यात होणार आहे. पहिल्या टप्यात झोन क्रमांक १ व ४ चे मल्लनिस्सारण वाहिनी २२० किमी टाकण्यात आली असून ममुराबाद रस्त्यावर ४८ एमलडी क्षमतेचे मल्लनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प तयार केला आहे. महापालिका प्रशासानाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाला या योजनचा विकास आरखडा तयार करण्याचे कामाचा निर्णय घेतला. त्यानुसार या योजनेच्या कामाला शासनासकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने करारनामा तसेच डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरवात करण्याच्या सुचना शासानाने मजीप्र व महापालिका प्रशासनाला दिल्या आहे.
६०० किमीची वाहिनी
मल्लनिस्सारण योजने अंतर्गत शहरात पाच झोन ५ झोन तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १ व ४ या झोन मध्ये काम पूर्ण झाले असून २, ३ व ५ या झोनमध्ये दुसर्या टप्याचे कामाचा आरखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ६०० किमीची मलवाहिनीमध्ये २ व ३ या दोन झोनमध्ये ३९० किमीची मलवाहिनी व ६० एमलडी क्षमतेचा एक मलनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प तर ५ क्रमांच्या झोनसाठी २१० किमी मलवाहिनी व ४२ एमलडी क्षमतेचा १ मलनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प असणार आहे.
मजीप्राने यंत्रणनेत केली वाढ
मजीप्राने या योजनेच्या विकास आरखडा तयार रण्याच्या काम हाती घेतले असून यंत्रणा वाढवली असून यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती मजीप्रा अधिक्षक अभियंता एम. जी. गिरगावकर यांच्या नियंत्रणाखाली तयार करून कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मनुरे, एम. बी. चौधरी, के. डी. झाडे, श्री. मराठे, श्री. अहिरे, श्री. गाजरे, श्री. बहादुरे व रोहीत सांगडे हे अभियंते हे विकास आराखडा, सर्वेक्षण, डिझाईनचे काम पाहणार आहे.