Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : पती घेत होता चारित्र्यावर संशय चिडलेल्या पत्नीने केला खून !
    क्राईम

    धक्कादायक : पती घेत होता चारित्र्यावर संशय चिडलेल्या पत्नीने केला खून !

    editor deskBy editor deskDecember 13, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील एका खेड्या गावातील पती व पत्नीच्या सतत होणाऱ्या वादामुळे व पती नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने चिडलेल्या पत्नीने रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादामध्ये पतीच्या डोक्यात व डोळ्यावर विळ्याने वार करीत त्याला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की, वरणगाव तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथील शेती करून आपला उदरनिर्वाह करणारे ४५ वर्षीय दगडू पुंडलिक सुरवाडे हे आपल्या पत्नी व दोन मुली व एक मुलगा यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. दि ११ रविवारच्या रात्री सायकाळी कामावरून घरी आल्या नंतर पुन्हा गावात पेरफटका मारून दारुच्या नशेत घरी आले व घरातील खाटवर बसुन पत्नीस तुझे पर पुरुषाशी संबंध आहे, असे वाईट बोलत असल्याचा राग अशाबाई दगडू सुरवाडे हिला अनावर झाल्याने घरातील लोखंडी विळ्याने पती दगडू सुरवाडे यांच्या डोक्यात सपासप वार करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात घरा शेजारी शेकोटीवर बसलेली मोठी मूलगी रोशनी ही जेवणासाठी घरात जाताच तिला खटखट आवाज आल्याने तीने दरवाजा ढकलून पहिले तर आई वडिलाच्या डोक्यात विळ्याने वार करीत असल्याचे पाहून हातातून विळा हिसकावत बाबाला मारू नको असे सांगून आरडा ओरडा केली. शेजार्‍याकडे मदतीसाठी धाव घेतली. शेजारी घराकडे येई पर्यत पुन्हा आशाबाईने विळा घेऊन डोळ्यावर डोक्यावर सपासप वार करून पतीस जागीच ठार केले.

    याबात मुलगी रोशनी दगडू सुरवाडे हिच्या फिर्यादी नुसार अशाबाई दगडू सुरवाडे च्या विरोधात भा द वी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशीयीत आरोपीस पोलीसानी ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष अडसुड हे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच सह पोलीस निरिक्षक आशिष अडसुड, उप सह पो.नि परशुराम दळवी व त्यांचे सहकारी घटना स्थळी दाखल होऊन घटनास्थळ पंचनामा केला खर मात्र महिलेस अटक करण्यासाठी महिला पोलीस शिपाई आवश्यकता होती परंतु वरणगाव पोलीस स्टेशनला एकही महिला पोलीस शिपाई नसल्याने बोदवड येथुन महिला पोलीसस पाचरण करून ताब्यात घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.