लाईव्ह महाराष्ट्र : रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झाले आहे पोलीस निरीक्षक याना चोरट्यांनी घरफोडी करून आव्हान दिले असून बंद घरातून 50 हजाराची रोकड लंपास केली.याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याबाबत पोलिस सूत्रा कडून मिळालेली माहीती अशी की , रावेर येथील शिक्षक कॉलोनी मध्ये रहिवाशी न्यना फत्तू तडवी हे बाहेर गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद असल्याने दि .३ – ९ -२१ ते ११ – ९ -२१ च्या दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी घरातील कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरून नेला याबाबत नयना फत्तू तडवी यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या वरुन ४५४/४५७/३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांचा मार्गदरशनाखाली पी एस आय सोनवणे तपास करीत आहेत.