• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळच्या तरुणाचा नागपुरात मृत्यू

editor desk by editor desk
December 4, 2022
in क्राईम, भुसावळ
0
भुसावळच्या तरुणाचा नागपुरात मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी 

नागपूर येथे महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून शहरातील श्रीराम नगरातील योगेश विजयकुमार चौधरी (वय २१) याचा  संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हा तरुण नागपूर येथे डिप्लोमा अभ्यासिकेचे शिक्षण घेत होता. योगेश हा युवक नागपुरातील रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम शिकत होता.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून तो गंभीर जखमी झाला. सुरक्षा रक्षकांना त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. योगेशच्या मृत्यूची माहिती त्याच्याच मोबाइलवरून त्याच्या वडिलांना आल्याने कुटूंब हादरले. माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी मदत केली. मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष रवी ढगे, पप्पू पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानदेव पाटील, वासुदेव पाटील, विपुल बऱ्हाटे यांनी नागपूर गाठले. शनिवारी सकाळी नागपूर येथे शवविच्छेदन करुन मृतदेह भुसावळ येथे आणून अंत्यविधी झाले.

वरणगाव आयुध निर्माणीत सेवेत योगेशचे वडील विजयकुमार चौधरी हे आहेत. तीन वर्षांपूर्वी योगेश पुणे येथे लॉ अभ्यासक्रम करत होता. मात्र, तो नापास झाला. यानंतर त्याने नागपूर येथील रायसोनी कॉलेजात डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. तो तेथेच राहत होता. शिक्षणाचे दोन वर्षे वाया गेल्याने तो नैराश्यात होता, असेही निकटवर्तीयांनी सांगितले. कुटुंबीयांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला.

Previous Post

हे फळ सालीसोबत खाल्यास होणार फायदे !

Next Post

”मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. मग राज्यपाल असो की राष्ट्रपती” गुलाबरावांनी दिला इशारा

Next Post
”मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. मग राज्यपाल असो की राष्ट्रपती” गुलाबरावांनी दिला इशारा

''मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. मग राज्यपाल असो की राष्ट्रपती'' गुलाबरावांनी दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group