Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धुम्रपान करत असाल तर हे होतील आजार !
    आरोग्य

    धुम्रपान करत असाल तर हे होतील आजार !

    editor deskBy editor deskNovember 16, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहराचे वाढत असलेले प्रदूषण अन् त्यात तुम्ही जर धूम्रपान करत असला, तर दीर्घकालीन फुफ्फुसांच्या आजारांपासून आताच सावध व्हायला हवे. सीओपीडी अर्थात क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीससाठी धूम्रपान हा सर्वाधिक परिणामकारक घटक असून, बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराचा धोका अधिकच वाढत आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे.

    श्वसनाचा एक दीर्घकालीन आजार, ज्यामध्ये लहान व मध्यम आकाराच्या श्वसननलिकांचा दाह होतो आणि त्यांना सूज येते. यामुळे श्वासनलिका आकुंचन पावतात आणि श्वासोच्छवासात (प्रामुख्याने उच्छवासात) अडथळा निर्माण होतो. अर्थातच फुप्फुसाची ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साईडची देवाणघेवाण करण्याची क्षमता कमी होते.

    लक्षणे
    दीर्घकालीन चालणारा खोकला
    काम केल्यावर धाप लागणे
    लवकर थकवा येणे

    परिणाम
    रुग्णाची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून जीवनशैलीची गुणवत्ता घटते.
    सीओपीडी हा दीर्घकालीन आणि वयपरत्वे वाढत जाणारा आजार असल्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास लक्षणांची तीव्रता वाढत जाते. काही विशिष्ट प्रकारच्या श्वसनक्रिया सीओपीडीमध्ये उच्छवासाला होणारा अडथळा कमी करतात. तर श्वास आत घेण्यावर भर देणारी श्वासाची प्रक्रिया फुप्फुसात जाणाऱ्या शुद्ध हवेचे प्रमाण वाढवते. फुप्फुसात साठून राहिलेला कफ काढण्यासाठीही फिजिओथेरपिस्ट काही विशिष्ट तांत्रिक पद्धतींचा वापर करतात. यामध्ये पॉश्चरल ड्रेनेजसारख्या पद्धती किंवा एकपेला, फ्लटरसारखी उपकरणे यांचा वापर केला जातो. लागणारी धाप आणि खोकला कमी करण्यासाठी हा कफाचा निचरा आवश्यक असतो. यामुळे वारंवार होणारा फुप्फुसांचा संसर्गही कमी होतो.

    एरोबिक व्यायामप्रकार
    एरोबिक म्हणजे चालणे, पळणे, पोहणे, सायकल चालवणे इ. व्यायामप्रकार करून स्नायूंची क्षमता वाढवता येऊ शकते. हे व्यायाम सातत्याने केल्यास स्नायू ऑक्सिजन योग्य प्रकारे वापरू शकतात आणि म्हणून रक्तातील ऑक्सिजन ठराविक सुरक्षित पातळीच्यावर राखला जातो. यामुळे येणारा थकवा आणि धाप दोन्ही कमी होते व कार्यक्षमता वाढते. शरीरात होणाऱ्या या सकारात्मक बदलामुळे रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य तसेच जीवनशैलीही सुधारते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.