पारोळा : प्रतिनिधी
येथील आय.डि.एल इंग्लिश मीडियम स्कूल येथे पारोळा तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटने कडून 15 नोव्हेंबर हा शिक्षकेतर दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पंकज पाटील हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शाल श्रीफळ देऊन येथे सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्षितकेले जाते त्यामुळे आपण आपली संघटना बळकट करून संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच जिल्हा सचिव गोरख पाटील यांनी 15 नोव्हेंबर 1967 साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक इतर संघटना महामंडळ स्थापन झाल्याने त्या दिवसाचे औचित्य साधून 15 नोव्हेंबर हा शिक्षकेतर दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात डॉ पंकज पाटील यांनी संघटना बळकट करणे यासाठी संघटित व एकरूप होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विनोद पाटील तर कार्यक्रमाचे आभार तालुका सचिव प्रसाद नावावर कर यांनी केले कार्यक्रमास योगेश पाटील ,अशोक पाटील, भूषण चौधरी, शांताराम चौधरी ,देविदास पारधी, दिलीप महाजन, निलेश पाटील ,योगेश बोरसे उमाकांत बाविस्कर माणिक पाटील, विजय पाटील, भागवत सोनवणे, ईश्वर पाटील मधुकर सदाशिव छोटू मोरे गजेंद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला