Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर-बोदवड मार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू, १३ जण जखमी
    क्राईम

    जामनेर-बोदवड मार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू, १३ जण जखमी

    editor deskBy editor deskJune 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    स्विफ्ट डिझायर व क्रुझर यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नाशिक येथील दोन महिलाचा जागीच मृत्यू झाल्या असून १३ जण जखमी झाले. ही घटना जामनेर – बोदवड रोडवरील मालदाभाडी गावातील नायरा पेट्रोल पंपाजवळ काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.

    या अपघातात मनीषा पवार (वय ३५), चैतन्य पवार (वय १४ दोघे राहणार नेरी), निता चिंचोले (वय ४०), सरला तायडे वय ४०), प्रिती बिऱ्हाडे (वय ३८), काव्या बिऱ्हाडे (वय ५१), पदमा पाटील (वय ७०), स्वाती चिंचोले (वय ३०), निता चिंचोले (वय ३८), उज्वला निकम (वय ३८), वैशाली पवार (वय ३९, सर्व राहणार खादगाव ता. जामनेर), नंदा माळी (वय ४० रा. जळगाव), हर्षल माळी (वय ३१ रा. नाशिक) असे १३ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ४ प्रवाशांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. तर स्विफ्ट डिझायरमध्ये बसलेल्या चंद्रकला सूर्यकांत माळी व यशोदाबाई पुर्ण नाव माहित नाही (दोघ रा. सातपूर नाशिक) या दोन महिलाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

    स्विफ्ट डिझायर कार ही गाडी नाशिकहून बोदवडकडे जात होती. तर क्रुझर गाडी मधील प्रवाशीमध्य प्रदेशातील भोपालजवळील सिहोर येथून देवदर्शन करून खादगाव येथे परत येत होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील हे बैठकीसाठी बोदवड येथे गेले होते. बैठक आटोपल्यानंतर ते जामनेरकडे येत असताना त्यांना हा अपघात झालेला दिसला. त्यांनी तिथे थांबून आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांना घटनेची माहिती दिली. जालमसिंग राजपूत लागलीच रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. कमलाकर पाटील, जालमसिंग राजपूत, डॉ. आनंद जैन यांनी जखमी प्रवाशांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. विनोद भोई व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लघुशंकेच्या वादातून तरुणाचा खून; फरार प्रियकर-प्रेयसी मध्यप्रदेशातून जेरबंद

    June 8, 2026

    दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांना लाकडी मोगरीने मारहाण !

    June 8, 2026

    वाळूच्या डंपरखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाचा अपघातानंतर पलायन

    June 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.