Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘या’ नेत्याचे कपडे फाडणाऱ्यास राष्ट्रवादीचे १० लाखांचे बक्षीस जाहीर
    क्राईम

    ‘या’ नेत्याचे कपडे फाडणाऱ्यास राष्ट्रवादीचे १० लाखांचे बक्षीस जाहीर

    editor deskBy editor deskNovember 9, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना बेताल वक्तव्य करणे चांगलेच महागात पडत आहे, राज्यभरात आंदोलन झाले असतानाचा दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडा असे आवाहन करत, कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केली आहे. जालना येथील राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी ही घोषणा केलीय.

    शिंदे गटावर ‘पन्नास खोके’ असा सतत होत असलेल्या आरोपाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत टीका केली होती. सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर आंदोलन करत त्यांच्या घराची तोडफोड देखील करण्यात आली. त्यातच आता जालना येथील राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्तार आणि राष्ट्रवादीमधील वाद आणखीनच वाढतांना पाहायला मिळतोय.

    यावर बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर म्हणाल्यात की, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा निषेध केला पाहिजे. फक्त सुप्रिया सुळे यांचाच नाही तर राज्यातील सर्वच महिलांचा सत्तार यांनी अपमान केला आहे. सुप्रिया सुळे या अब्दुल सत्तार यांच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. तर अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथे दौऱ्यावर असतील तेथील तिथे त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडावे आणि कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस माझ्याकडून देण्यात येईल असे रेखा तौर म्हणाल्यात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.