Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सर्जाराजाचा पोळा सण डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात साजरा
    जळगाव

    सर्जाराजाचा पोळा सण डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात साजरा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय परिसरात आज सर्जाराजाचा पोळा ह्या सणानिमित्‍त बैलजोडींचे पूजन करत त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बळीराजाचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला तसेच पोळा सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.
    भारत हा कृषीप्रधान देश आहे. जमिनीतून उत्पादन घेण्यासाठी बळीराजासोबत सर्जाराजा देखील राबत असतो, या सर्जाराजाचे महत्व अधोरेखित करणारा पोळा हा सण यंदा ६ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशन येथे साजारा करण्यात आला. याप्रसंगी शेतकर्‍यांनी आपल्या बैलजोडींची सजावट करत त्यांना पूजनाच्या ठिकाणी आणले होते. गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी बैलजोडीचे पूजन केले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील यांनी बैलजोडीला नमस्कार करत त्यांच्यापुढे धान्याची रास खाण्यास ठेवली. डॉ.उल्हास पाटील यांनी शेतकर्‍यांना शाल, श्रीफळ, टोपी घालून सन्मानित केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, हॉर्टिकल्चरचे प्रा.सतीश सावके, प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, प्राचार्य शैलेश तायडे, उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके आदि उपस्थीत होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.