जळगाव ;- – ५ सप्टेंबर, भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून सन १९६२ पासून
साजरा करण्यात येतो. एका राष्ट्रपतींचा वाढदिवस तो मूलत: शिक्षक असल्यामुळे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो, या भारतातील फारच सुसंस्कृत व
दर्जेदार घटनेचे जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी (हेडगर्ल)व्रजेषा सेठ व(हेडबॉय) आदित्य कुलकर्णी ह्या विद्यार्थ्यांनी कार्याक्रमाची रूपरेषा मांडली. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी
शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले.शाळेचे उपप्राचार्य श्री.दिपक भावसार यांनी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी,सन्माननीय
पालक,विद्यार्थी तसेच उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्याक्रमची सुरुवात करण्यात
आली. ’ थँक अ टिचर’ सप्ताहास प्रारंभ झाल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
देवश्री महाजन या विद्यार्थिनीने शिक्षकवर्गाला समर्पित कविता सादर केली.कार्यक्रमा दरम्यान वेदिका अग्रवाल हिने आपल्या हिंदी भाषणातून
शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला तर सौम्य पटेल याने पॉवरपॉइंट सादरीकरण करीत साथ दिली.शर्मिष्ठा पाटील हिने इंग्रजी कवितेतून शिक्षकांची
भूमिका विषद केली.या पाठोपाठ चिंतना महाजन या विद्यार्थिनीने आपल्या इंग्रजी भाषणातून समाज घडणीत शिक्षकांच्या समर्पित सेवेचे महत्व
पटवून दिले.तर अवनी पंजाबी या विद्यार्थिनीने हिंदीतून काव्य वाचनातून उपस्थित शिक्षकांना मानाची सलामी दिली.यावेळी देवश्री महाजन हिने
सुंदर कविता सादर करून आपल्या गुरुजनांचा आदर केला.
यावेळी लोकेश तायडे ,राजवी कुलकर्णी व पुर्विका धांडे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास विविध मनोरंजनाचे खेळ व स्पर्धा आयोजित केल्या होत्या
.शिक्षकांनी हिरीरीने सहभाग घेवून या रंगारंग कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट ऑनलाइन वर्गातील अध्यापनाच्या नियोजनापर्यंत सर्व जबाबदारी शाळेच्या विद्यार्थी शिक्षकांनी पार पडली. गुगल
मिट च्या माध्यमातून विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी उपस्थित शिक्षकवृन्दाचा सत्कार केला.आपल्या भाषणातून गुरुजनांविषयी आदर व्यक्त करीत त्यांचे
आभार मानले.जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत
अधिक महत्त्व आहे. कोणतीही व्यक्ती ही कायम विद्यार्थीच असते, असे म्हणतात. प्राथमिक गोष्टी आई शिकवते. समाजात वावरण्यापासून ते मनगट
बळकट करण्यापर्यंतचे शिक्षण शिक्षक देत असतात असे विचार मांडले.
मातृपितृ ऋण,गुरु ऋण आणि समाज ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्याने कटिबद्धअसले पाहिजे असे मत त्यांनी मांडले.विद्यार्थ्यांची पात्रता वाढविण्यात आणि त्यांना भारताचे सक्षम नागरिक होण्यात शिक्षकांची भूमिका अतिशयमहत्वाची आहे.श्रध्दास्थान व प्रेरणास्त्रोत असलेल्या गुरुजनांना नतमस्तक होवून त्यांच्या शिकवणी आचरणात आणल्या तर हीच खरी गुरुदक्षिणा ठरेल. तसेच नव्या शिक्षण धोरणामुळे (एनईपी २०२०) विद्यार्थ्यांचा कौशाल्यविकास साधता येणार आहे व प्राप्त केलेल्या कौशल्यामुळे विद्यार्थी आत्मनिर्भर होण्यास निश्चितच मदत होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी घरूनच मोठ्या प्रमाणात ऑनलाइन उपस्थिती दर्शविली. कार्याक्रमचे थेट प्रक्षेपण युट्युब च्या माध्यमातून करण्यात आले.
शाळेचे उपप्राचार्य श्री दिपक भावसार ,पोदार जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ ,प्रशासकीय अधिकारीश्री जितेंद्र कापडे वरिष्ठ समन्वयक श्री हिरालाल गोराणे ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतरकर्मचारी यावेळी उपस्थित होते.आभारप्रदर्शन रोनित पाटील व फाल्गुनी चव्हाण या विद्यार्थ्यांनी केले.