प्रमाणपत्रासाठी ३२ हजारांची लाच घेतांना अटक
रावेर प्रतिनिधी । । पेट्रोलपंपाशी संबंधित स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी माप निरीक्षकाला ३२ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याची प्रकार समोर आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुनिल रामदास खैरनार (वय-५६) रा. एसएमआयटी कॉलेज, जळगाव असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवाशी असून त्यांनी रावेर येथे ११ महिन्यांच्या करारावर पेट्रोलपंप भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. या पेट्रोल पंपाच्या ४ झोनल मशीन स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त रावेर येथील वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सुनिल खैरनार यांनी ३२ हजाराची मागणी केली. त्यानुसार जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ३२ हजाराची लाच स्विकारतांना निरीक्षक सुनिल खैरनार यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.