जळगाव : प्रतिनिधी
जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे, तसेच आयइआय चाप्टर नाशिक, कोग्निडो. एआय, इंडेस व स्पारफिसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ सप्टेंबर रोजी ‘एआय राष्ट्रीय परिषदे’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा उपस्थित होते.
राष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा आहे. पहिल्या सत्रात बीजभाषक म्हणून भूषण पाटील हे ‘एआय न्यू रिटेल मार्केटिंग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात ‘कॉम्प्युटर व्हीजन इन एआय व प्रॅक्टिकल स्वरम इन इंटेलिजन्स इन एआय’ या विषयावर मावेनीर सिस्टमचे वरिष्ठ सदस्य दीपक प्रधान, आयआयआयटी पुणे येथील प्रा. डॉ. अमृता लिपारे व सुरत येथील एसव्हीएनआयटीचे प्रा. डॉ. प्रशांत शहा मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर परिषदेत ट्रेनर सुधीर साजन, अभिज्ञानम गिरी, रोहित कुकरेजा, योगेश मुरूमकर, डॉ. संदीप एस. उदमले आदी मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.