Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पावसाने घेतली उसत,38 गावे बाधित637 घरे बाधित 300 दुकानाचे नुकसान !
    आरोग्य

    पावसाने घेतली उसत,38 गावे बाधित
    637 घरे बाधित 300 दुकानाचे नुकसान !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 1, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगांव प्रतिनिधी: जिल्ह्यातील चाळीसगाव शहरासह गावांना पुराने वेढले होते मात्र पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने जोमाने कामे व मदत कार्य सुरू केले आहे पूरपश्‍चात परिस्थितीत स्वच्छता, मदत आणि पुनर्वसनाचे मुद्दे महत्वाचे ठरणार असून तितुर,डोगरी नदीला आलेल्या पुरामुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगावमधील एकूण ३८ गावे बाधीत झाली आहे. 661पशूंहानी झालिअसून 675 घराची अंशतः व पूर्ण घराची पडझड झाली आहे 300 दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

    अतिवृष्टीमुळे काल चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला असतांना रात्रभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
    काल दिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडतच असल्याने सर्वच जण धास्तावले होते. तथापि, सायंकाळपासून पावसाने बर्‍याच प्रमाणात उसंत घेतली आहे. रात्रभरातून तर तालुक्यात कुठेही मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त नाही. यामुळे बहुतांश ठिकाणी शिरलेले पुराचे पाणी आता ओसरल्याचे दिसून येत आहे. खोलगट भागांमध्ये अद्यापही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. तर, शेतांमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.
    दरम्यान, कन्नड घाटात काल सकाळपासून सुरू असलेले रस्ता मोकळा करण्याचे काम आज सकाळी देखील सुरूच असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एसडीआरएफचे पथक अव्याहतपणे काम करत असल्याने रस्ता मोकळा करण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र आजही महामार्ग पूर्णपणे खुलणार की नाही ? याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. एकंदरीत पाहता पावसाने उसंत घेतल्याने चाळीसगाव तालुका वासियांना बर्‍याच प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. आता प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

    चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे. आज रात्री निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी जाहीर आहे.

    उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की,३१ रोजी पहाटे सुमारे २.०० ते ३.०० वाजे दरम्यान अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळली असुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी एसडीआरएफचे धुळे येथील पथक कार्यरत आहे. कालपासून चाळीसगाव तालुक्यातील तितूर व डोंगरी नदीला पूर आलेला आहे. रात्री झालेल्यापावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील खालील नमुद गावे आणि चाळीसगाव शहरातील सखल भागातील  घरांत पाणी शिरले आहे. चाळीसगांव शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तेथील लोकांची तात्पुरती व्यवस्था ए.बी. हायस्कूल व उर्दू हायस्कुल चाळीसगांव मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे जेवणाची व्यवस्था चाळीसगांव नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे.

    दरम्यान, या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील 32, पाचोर्‍यातील  4 तर भडगावमधील 2 असे एकूण 38 गावे बाधीत झाली आहेत. यात 1 जणांचा बळी गेलेला आहे. अतिवृष्टीमुळे 155 लहान तर 506 मोठी गुरे वाहून गेली आहेत. जोरदार पावसामुळे 38 घरे पूर्ण तर 637 घरे अंशत: वाहून गेली आहेत. तर पाण्यामुळे 300 दुकानांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज या अहवालात वर्तविण्यात आलेला आहे. तर अतिवृष्टीमुळे 15915 हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या आठवडाभरात नुकसानीची पूर्ण माहिती घेतली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी या अहवालात म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव नगरपरिषद निवडणुकीला उत्साह : २३ जागांसाठी १८८ अर्जांची विक्री !

    November 13, 2025

    मध्यरात्री रस्त्यावर चार अज्ञातांनी ठेकेदाराला मारहाण करून तीस हजार रुपये लुटले !

    November 13, 2025

    खळबळजनक : पैसे देण्याास नकार दिल्याने चॉपरने केले वार !

    November 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.