भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर दोन इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून दोन बनाबट
गावठी पिस्टल सह पाच जिवंत काडतुसे बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोकॉ प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 18/09/2022 रोजी 04:15 वाजेला भुसावळ शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून बसले असता सै. सिकंदर बशरत अली वय 42 राहणार कवाडे नगर भुसावळ.नरेश देविदास सुरवाडे वय 29 राहणार गोलानी कॉम्प्लेक्स हनुमान मंदिर जवळ भुसावळ हे त्यांच्या कब्जात विना पास परवाना गावठी बनावटीचे दोन पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगतांना मिळून आले तसेच एक हिरो कंपनीची काळ्या लाल रंगाची मोटरसायकल असे एकूण 50,500 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून आरोपितांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 3/25 व म.पो.अधिनियम कलम ( 37) (3) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सपोनि हरीष भोये,पोहेकॉ विजय नेरकर, पोना.निलेश चौधरी,पोना.उमाकांत पाटील,शशिकांत तायडे, पोकॉ.प्रशांत परदेशी,योगेश माळी,सचिन चौधरी,पोना.दिनेश कापडणे अशांनी मिळून केली.