जळगांव : प्रतिनिधी
गणेशोत्सव निमित्त मेहरुन तलाव परिसरात दरवर्षी प्रमाणे गणेश घाटात गणपती विसर्जन केले जाते. त्या ठिकाणी भरपुर प्रमाणात प्लास्टिक पिशवी, निर्माल्य असतात.
त्यामुळे पाणी दूषित होऊ नये या अनुषंगाने जळगांव प्लॉगर आयोजित स्वच्छता अभियानात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मौलाना आझाद फाऊंडेशन या संस्थांनी सहभाग नोंदवला व मेहरुन तलाव व गणेश घाट परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आले.
जळगांव प्लॉगर्स चेतन जैन, ओम साहित्य, खुशी सांगोर,रेवती पाटील,कुणाल भंगाळे,हितेश नेरकर,घनश्याम सूर्यवंशी,प्रयाग पाटील,संभव मेहता, मनिषा पाटील, नुतन तासखेडकर, रेणुका हिंगु, योगिता बाविस्कर, भारती कापडणे,गायत्री चौधरी,कविता पाटील,आशा मौर्य,मनोज भालेराव,सलीम इनामदार, इम्रान शेख, प्रेम केळकर, नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख आदींनी स्वच्छता अभियानात श्रमदान दिले आहे. जळगांव महानगरपालिका व कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.